स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३
नवी मुंबई : वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. त्यात महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. भाज्या महाग, सिलेंडर महाग, आता जी.एस.टी पण लावतात, सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? मुलांची शाळा, घरखर्च, पेट्रोल डिझेल, सीएनजी याची सतत होणारी दरवाढ या सर्वांचा निषेध म्हणून सणासुदीला सर्व महिलांनी एकत्र येऊन महागाईची हंडी फोडली. ही महागाईची हंडी फोडण्याच्या कार्यक्रमात कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर, कुमार यादव, सौ. सीमा वाघ, सौ. पुनम साळुंखे, सौ. रुपाली साळुंखे, सौ. सुनीता शिंदे, सौ. ज्योती औटी यांच्यासह लहान बाळ गोपाळ कृष्ण बनून आलेली लहान मुले गंधर्व औटी, ध्रुव, विघ्नेश माने, साळुंखे, परी पवार, तन्वी साळुंखे व बालगोपाळ यांनी सहभाग घेतला.