नवी मुंबई : प्रभाग ३० मध्ये डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी व साथीच्या आजारावर नियत्रंण मिसानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान तातडीने राबविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक परिसरात साथीचे आजार वाढीस लागले असून साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. डासांमुळे सार्वजनिक ठिकाणी, इमारतीच्या तळमजल्यावर, उद्यानातही लोकांना फिरणे अवघड झाले आहे.
आपण प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.