नवी मुंबई : शिवसेनेची पुनर्बांधणी आणि दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी ऐरोली येथे आयोजित करण्यात आलेला शिवसैनिकांचा मोळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.
ऐरोली येथील सेक्टर ८ अ मधील लक्ष्मी नारायण म्हात्रे सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, संपर्क प्रमुख आप्पा पराडकर, आण्णा देशमुख, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मनोज हळदणकर, ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हा संघटक विनया मढवी, वैशाली घोरपडे, उपशहरप्रमुख विजयानंद माने, रवी पाटील, डी. आर. पाटील, पूनम आगवणे आदी उपस्थित होते.