Navimumbailive.com@gmail.com _९८२००९६५७३
पनवेल : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि देशाचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरदश्चंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (ता. ११) सकाळी १०: ३० वाजता वीर पत्नी, वीरमाता, वीर पिता, राष्ट्रपती पदक विजेते सैनिक, माजी सैनिक आणि सक्रिय सैनिकांचा गौरव विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने संयुक्तिकरित्या ठाणा नाका येथील अंजुमन इस्माईलच्या कलसेकर कॉलेजच्या सभागृहात आयोजित केला आहे. राष्ट्राप्रती संवेदना, प्रिती, भक्ती व्यक्त करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
देशाच्या सीमा सुरक्षित ठेवताना भारतीय जवानांनी वेळप्रसंगी प्राणाची आहुती दिली आहे. ऐन तारुण्यात कुणा भगिनीचे सौभाग्य उद्धवस्त झाले. कुणा मायेची कूस कायमची हरपली. कुणा पित्याचे छत्र नष्ट झाले. पण असावांचे हुंदके गिळून त्यांनीही देशाप्रती त्यागाची भावना हृदयात जपली. रायगड जिल्ह्याला सैनिकांचा मोठा वारसा आहे. शहीदांची उज्वल परंपरा आहे. त्या साऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, राष्ट्रपती पदक विजेते सैनिक, माजी सैनिक आणि सैनिकांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी मंत्री व आमदार आदिती तटकरे, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, राज्य परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी आणि माजी सैनिक अनिल पाटील, रायगड उपजिल्हा सैनिक अधिकारी गोविंद साळुंखे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील, आर. सी. घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, शिवसेनेचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख सतीश पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील शेकापचे जिल्हाप्रमुख गणेश कडू, शेकाप विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सूरदास गोवारी, सुदाम पाटील, पनवेल राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रमुख भावना घाणेकर, शेकाप महिलाध्यक्षा अनुराधा ठोकळ, शिवसेना (ठाकरे गट ) महिला आघाडी प्रमुख कल्पना पाटील, काँग्रेस महिला अध्यक्षा प्रमुख निर्मला म्हात्रे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे आयोजकांनी कळविले आहे.