सलमान खान, हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला आघाडीचा कलावंत आणि बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक चेहरा तसेच समाजातील अपप्रवृत्तींच्या विरोधात लढा देणारी मुलुखमैदानी तोफ. दोघांचेही क्षेत्र वेगळे , पण दोघांचेही त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व. नुकतीच एका कार्यक्रमात अभिनेते सलमान खान आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट झाली. मंदाताई म्हात्रे यांनी सलमान खान यांचा सत्कार केला. दोघेही त्यांच्या कार्यात व्यस्त असतानाही त्या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत बराच वेळ गप्पाही मारल्या.