अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैराणे नोडमधील प्रभाग १६च्या कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व कॉंग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक सुभाष कानडे यांच्या हस्ते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या उपस्थितीत शनिवारी सांयकाळी करण्यात आले.
यावेळी उद्घाटक सुभाष कानडे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जनसेवेतून पक्षसंघटना लोकाभिमुख करताना पक्षाचा जनाधार वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष, नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष, कॉंग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते – कामगार नेते रविंद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऐजाज हुसेन, कॉंग्रेसचे कोपरखैराणे ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष धोंडीराम पाटील ,कोपरखैराणे ब्लॉक कॉंग्रेसचे सचिव सलीम अन्सारी, कोपरखैराणे ब्लॉक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि नवी मुंबई इंटकचे उपाध्यक्ष सुनील पारकर, कोपरखैराणे ब्लॉक उपाध्यक्ष अभिजित काकडे, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या लीना लिमये, समाजसेवक संदीप डिचोलकर, प्रभाग १६चे कॉंग्रेस अध्यक्ष विकास शिंदे, प्रभाग १६चे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्षा श्रीमती. सौ. हुरूनिशा खान, अमित हांडे, प्रभु कोरे, गणेश मोरे काका, राहुल गावडे, अशोक कंक, रितेश जयस्वाल, राहुल सिंग, विशाल शुक्ला, किरण चिकणे, शुभम सावरतकर, परशुराम कोरे, सोमेश उबाळे, अलिम अन्सारी आदी महिला कार्यकर्त्या व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.