नवी मुंबई : सानपाडा नोडमधील समाजसेवक पांडुरंग आमले यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेली काही वर्षे सामाजिक कार्यातून जनसामान्यांत भाजपसाठी काम करणाऱ्या पांडुरंग आमले यांच्या कार्याची भाजपकडून दखल घेण्यात आली असून त्यांची पोचपावती त्यांनी भाजयुमोच्या माध्यमातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सानपाडा हा नोड हा पूर्णपणे शिवसेनामय असून एका प्रभागात दिलीप बोऱ्हाडेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गेल्या सभागृहात अस्तित्व दिसून येत होते. कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षे पांडुरंग आमले यांनी सातत्याने जनताभिमुख कामे करत जनतेत राहून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीच्या अगोदर, कोरोना महामारीत व कोरोना महामारीतही पांडुरंग आमले सानपाडा नोडमध्ये कार्यरत राहील्याने भाजपचे पांडुरंग आमले अशी त्यांची सानपाडावासियांत प्रतिमा निर्माण झाली आहे. स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निकवर्तीय समर्थकांमध्ये पांडुरंग आमले यांची गणना होत असून मंदाताई म्हात्रे यांचे विश्वासू म्हणून सानपाडा नोडमध्ये त्यांची प्रतिमा आहे. आमदार मंदाताईंच्या माध्यमातून पांडुरंग आमले सातत्याने सानपाडा नोडमधील समस्या सोडवित असतात. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सानपाडा नोडमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पांडुरंग आमले पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करत असतात. पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. आजवर कार्यकर्ता म्हणून जनसेवा व भाजप पक्षसंघटनेचे कार्यकर्ता म्हणून काम करणारे पांडुरंग आमले जनसामान्यात व पक्षसंघटनात्मक पातळीवर भाजयुमोचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातील. त्यांच्या निवडीबद्दल आमदार मंदाताई म्हात्रेंपासून ते भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सानपाडा नोडमधील विविध गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी व रहीवाशी व अन्य सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.