अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण सोसायट्यांसमोरील अंधार संपुष्ठात
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ मधील गृहनिर्माण सोसायट्यांनी रस्त्यावर पथदिवे नसल्याने सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावरच अंधार पडत असल्याची समस्या स्थानिक रहीवाशांनी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्याकडे मांडताच त्यांनी तात्काळ पालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रहीवाशांना नवीन पथदिव्यांची सोय करून दिल्याने येथील अंधाराची समस्या कायमस्वरुपी निकाली निघाली आहे.
जुईनगर सेक्टर २४ मधील ओमकार व पंचरत्न सोसायटीतील रहीवाशांनी प्रवेशद्वारालगत पथदिवे नसल्याने अंधारामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची रविंद्र सावंत यांच्यासमोर व्यथा मांडली व लवकरात लवकर या समस्येचे निवारण करण्याचे साकडे रविंद्र सावंत यांना घातले. मुख्य रस्त्यावर पथदिवे होते, पण अंर्तगत रस्त्यावर नसल्याने अंधाराचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत होता. कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे या समस्येविषयी तक्रार करताच व संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेवुन समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहीवाशांची होत असलेली गैरसोय संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. पालिका प्रशासनाने ओमकार व पंचरत्न गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळ नवीन पथदिप लावत अंधाराची समस्या संपुष्ठात आणली. या पथदिव्याचे उद्घाटन स्थानिक रहीवाशांनी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या हस्ते करताना त्यांचे आभार मानले. यावेळी . समाजसेवक विनायक चौगुले, तरडे, अनिल निकम, शिवाजी सावले, दादा बोरकर, राजाराम शिंगाडे, बच्चाराम मगदुम, नितिन काजवे, रमेश मांडके, अनिल कदम, मंदार घुगरे, प्रमोद तरडे, लालू ननावरे, प्रभुदास मात्रे, बाळु पवार, रविंद्र बाबर, गौरी, मनोहर बंडगर यांच्यासह स्थानिक गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशी उपस्थित होते.