संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातील १३ हजार ७२९ हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचे नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. READ MORE
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सभागृहात केली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागितले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नकसानीबाबत देवेंद्र फडणवीस माहिती सांगतना विरोधकांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. तत्काळ शेतकऱ्यांनी मदत करा अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, राजकारण करु नका, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.