अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथे नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने व कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांच्या आयोजनातून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक महिला दिनानिमित्त काँग्रेस जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांच्या नेरूळ सेक्टर दोन येथील जनसंपर्क कार्यालयात नेरूळ व जुईनगरमधील स्थानिक रहीवाशांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर, आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्स कार्ड तसेच महिलांन आरोग्य विषयक माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील रुपरेषा विषद करताना सांगितले विद्याताई भांडेकर यांनी सांगितले की, सध्याच्या व्यस्त काळात महिलांना सध्याच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. घराच्या अस्तित्वासाठी, प्रगतीसाठी घरातल्या महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर संपूर्ण घर निरोगी राहिले जाईल. तसेच महिलांना बाहेरच्या जगात वावरतांना प्रत्येक विषयांची कायदेशीर माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे महिलांच्या माहितीस्तव आजच्या दिवशी त्यांना कायदेशीर सल्ले देण्यात आले असल्याचे विद्याताई भांडेकर यांनी सांगितले.
यावेळी परिसरातील महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. सध्याच्या धावपळीच्या युगात महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास पुरेसा वेळ नसल्याने बहुतांश महिला वर्ग या लहान सहान आजार अंगावर काढतात.त्यामुळे भविष्यात त्यांना त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच महिलांनी आरोग्या विषयी जागरूकता दाखवली तर पुढील धोका टळला जावा याकरिता काँग्रेस च्या महिला सचिव विद्या भांडेकर यांनी जागतिक महिला दिनी महिलांसाठी आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केला होता. वयाच्या चाळीशी नंतर महिलांना विविध आरोग्याच्या समस्या भेडसावल्या जातात. तसेच सध्या फास्टफूडमुळे महिलांना कमी वयातच अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. याकरिता उपस्थित महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित मोलाचे मार्गदर्शन तर केलेच, याशिवाय त्यांना आहाराबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या आरोग्याबाबत तज्ज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमात महिलांना कायदेशीर अधिकाराची माहिती देण्यात आली. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी मंगल बागडे, सुरेखा मोहिते, सीमा वाघ, रुपाली साळुंखे, अश्विनी पंडित, सुनीता शिरसागर, दिपाली नलावडे, पुनम साळुंखे ,रेश्मा पवार, विमल कांबळे आदी उपस्थित होत्या.