संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी नेरूळ सेक्टर ६ परिसरात घराघरामध्ये जावून विधवा महिलांचा सत्कार केला.
आयुष्यभर संघर्ष करत पतीसोबत संसाराची उभारणी करत हयात घालविली आणि पतीपश्चात घराचा डौलारा सांभाळत मार्गदर्शकाच्या भूमिकेत मुला-मुलींच्या संसारात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या विधवा महिलांचे घरातील अनन्यसाधारण महत्व कोणी नाकारु शकत नाही. पडद्याआड राहून संसाराचे सुकाणू सांभाळणाऱ्या या महिलांच्या कार्याप्रती नतमस्तक होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सौ. सुषमा पवार यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत सौ. भारती टाव्हरे, सौ. वर्षा भोर, सौ संध्या शेळके यांनी घरोघरी जाऊन सत्कार समारंभ कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी योगदान दिले.