स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सीवूडस, सेक्टर ४८ येथील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी भाजपाचे नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रथम नगरसेवक भरत जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
सीवूडस सेक्टर ४८ मधील सूर्योदय सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत काम करणारा ठेकेदार व त्याची यंत्रणा अर्धवट काम करून मातीवरच डांबरीकरण करण्याचे अंदा धुंद काम करत आहे. त्यामुळे नाहक कामाचा दर्जा खराब होत असून वारंवार खड्डे होत असल्याचे तक्रारी स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक भरत जाधव यांच्याकडे केल्या आहेत. तक्रारकर्त्या नागरिकांनी भरत जाधव यांना पाठविलेले फोटो भरत जाधव यांनी महापालिका प्रशासनाला पाठविताना लवकरात लवकर रस्त्यावरील अर्धवट खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.