अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ व जुईनगरमधील महिलांसाठी प्रगती महिला बचत गट आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हे वर्ग १० एप्रिलपासून सुरू होत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस पाहता, नेरूळ व जुईनगरमधील महिलांना मेहंदी प्रशिक्षण, अॅडव्हॉन्स ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग आदी उपक्रमाचे प्रशिक्षण नेरूळ सेक्टर दोनमधील दत्तात्रेय सोसायटी, ऑफिस क्रं ११या ठिकाणी देण्यात आहे. वाढत्या महागाईच्या काळात महिलांना स्वत: सक्षम होऊन घरासाठी आर्थिक हातभार लावावा या हेतूने या उपक्रमाचे स्थानिक महिलांना प्रशिक्षण देण्याचा हेतू असून परिसरातील अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका विद्याताई भांडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छूक महिलांनी ९७०२६०५३२१ या क्रमाकांवर संपर्क साधावा.