श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मध्ये भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या अथक प्रयत्नांतून तसेच आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ सेक्टर-१६,१६ए आणि १८ येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे कामाचा शुभारंभ रविवार, १६ एप्रिल रोजी विभागातील स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनच्या हस्ते करण्यात आला.
प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मा.नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी सीसीटीव्ही कॅमेरा मागणीचा अविरत पाठपुरावा २०१५ ते २०२३ पर्यंत पालिका सभागृह,पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, नेरुळ पोलीस ठाणे, स्थानिक आमदार यांच्याकडे लेखी निवेदनातून तसेच भेटीतून केला होता,
सदर काम मंजूर करून कामाला सुरूवात झाल्याने विभागातील नागरिकांनी स्थानिक आमदार सौ.मंदाताई म्हात्रे आणि स्थानिक मा.नगरसेविका सौ.रूपालीताई किस्मत भगत यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभार मानले आहेत.
सदर कामाच्या शुभारंभाच्या वेळी समाजसेविका सौ.विमल गांडाळ, सौ. कल्पना पाटील, सौ. छाया चव्हाण, सौ. ज्योती सरवदे, सौ. उषा सावंत, सौ.आरती मोढवे, सौ.सुनीता निमसे, समाजसेवक गणेशदादा भगत, संजय पाथरे, राजू तिकोने, प्रदीप कलशेट्टी, मधुसूदन पाडावे, गोरक्षनाथ गांडाळ, गणेश नाईकडे, प्रमोद प्रभू, शिवाजी पिंगळे, भरत सकपाळ, शरद भोर, विकास तिकोने, कैलास चव्हाण, विजय पवळे, योगेश, बरबडे, रंगनाथ बारवे, अंकुश माने, विजय पातेरे, विनोद चाळके, तुकाराम जुनघरे, विलास चव्हाण, राजेंद्र कांबळे, विलास शेलार, भगवान पाटील, सहादू सुकाळे, गणेश सैद, दिलीप राऊत, अरविंद इंगवले, दादासाहेब लोंढे, संजय पवार, अप्पाराव मागावं, राजेंद्र बोंबले, अजय लकडे, प्रकाश वेद्रे, संतोष शिंदे, सुधीर पोखरकर, अशोक गांडाळ, रवि गावंड, अशोक पिंगळे, चंद्रकांत देशमुख, पांडुरंग बेलापूरकर, बी जी कुंभार, दिंगंबर वायकर, अनंत कदम, तानाजी चव्हाण, सुधीर बाणखेले, राकेश मोरे, श्रयेश परशेटे, सौरव सावंत, अविनाश तिकोने, गौरव सूर्यवंशी, असिफ शेख, रमेश नावैकर, मयुर पवार, गणेश नागरगोजे, शत्रुघ्न म्हात्रे, नंदेश भगत, दर्शन,म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, जयेश पवार, विजय पिंगळे, श्रीधर मोरे, मोहन चोरट, अरविंद पिसाळ, मंगेश राऊत, रविंद्र भगत उपस्थित होते.
या अगोदर प्रभागातील जनतेसाठी शाळेसाठी नवीन इमारत, अभ्यासिका, ग्रंथालय, नवीन रस्ते, नवीन गटर, नवीन खेळणी, ओपन जिम, प्रसाधनगृह (टॉयलेट), बस स्टॉप , एलईडी लाईट, मैदान व उद्यान सुशोभिकरण,नामफलक, चौकांचे सिमेंट काँक्रीटीकरण, प्रभाग स्वछता मोहीम आदी कामे करताना माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन उपलब्ध करुन दिल्या आहेत.