• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2023

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सद्य:स्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले की, माणसाच्या शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे काम करेनाशी होते आणि उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ व उलट्या होणे, डोके दुखणे, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, प्रसंगी आकडी येणे अशी विविध प्रकारची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी, रुग्णालयाशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.

सध्या तापमानातील प्रचंड वाढीमुळे उष्णतेचे आजार व उष्माघात टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे, हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल, छत्री अथवा टोपी, बूट अथवा चप्पल यांचा वापर करावा तसेच प्रवास करताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी असेही आवाहन करण्यात येत आहे.

उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक अशी पेये नियमित घ्यावीत.

दिल्लीमध्ये उन्हाळा उशीरा सुरु होत असल्याने सीबीएसई बोर्डाला जून मध्ये उन्हाळी सुट्ट्या दिल्या जातात. सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्या मे महिन्यात दिल्या जाव्यात तसेच शालेय वाहतुकी दरम्यान हायड्रेशन राखण्यासाठी पीटीच्या तासातील मैदानी खेळ सकाळी ९.३० च्या आधी संपवावेत असे सूचित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आऊटडोअर ॲक्टिव्हिटी सायं. ५ नंतर ठेवाव्यात जेणेकरून सुर्यप्रकाशाची तीव्रता कमी जाणवेल. तसेच दर तासाला पाणी पीने, शाळांमध्ये टोपी घालणे अनिवार्य करावे आणि फळांचे सेवन वाढवावे असेही सूचित करण्यात येत आहे.

उन्हाचा त्रास होऊ लागल्यास तात्काळ नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राशी अथवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. याठिकाणी उष्णलहरी बाधित रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याची व त्यासाठीचा आवश्यक औषध साठा करून ठेवण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत.

महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार उष्माघाताच्या रूग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे विशेष उपचार कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

उच्च तापमानामुळे उष्णतेच्या आजाराचा धोका असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी सूचित करित महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उष्णतेचा वा उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयाशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Previous Post

जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार : रविंद्र सावंत

Next Post

महापालिका क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरूस्ती करा : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

महापालिका क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरूस्ती करा : पांडुरंग आमले

नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

प्रभाग ९६ मध्ये वृक्षछाटणी अभियान राबवा : सौ. रुपाली किस्मत भगत

कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

कोपरखैराणे प्रभाग १९ मध्ये वृक्षछाटणी अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com