नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ च्या नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ परिसरातील वृक्षांच्या धोकादायक व ठिसूळ झालेल्या फांद्यांची लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्याची लेखी मागणी जपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ ए आणि १८ या सेक्टरचा समावेश होत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर वृक्षछाटणीबाबत आम्ही संपर्क केल्यावर वृक्षछाटणी करणारे वाहन नादुरूस्त आहे, इकडे गेले आहे, तिकडे गेले आहे अशी प्रशासनाकडून उत्तरे मिळतात. त्यामुळे अद्यापि सव्वा महिन्याचा पावसाळ्यास कालावधी असतानाच प्रभाग ९६ ची पाहणी करून नेरूळ सेक्टर १६,१६ ए आणि १८ या परिसरातील अंर्तगत व बाह्य भागातील तसेच सार्वजनिक ठिकाणच्या वृक्षांच्या धोकादायक व ठिसूळ झालेल्या फांद्यांची लवकरात लवकर छाटणी करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली आहे.
पामबीच मार्गाला समांतर असा एक रस्ता सेक्टर १६,१८ मधून जात आहे. या ररस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. रिक्षा स्टॅण्ड असल्याने रिक्षाही उभ्या असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. त्यामुळे ठिसूळ झालेल्या फांद्या पडल्यास वाहनांचे नुकसान होऊ शकते. तसेच जिवितहानीचीही भीती आहे. सकाळी-दुपारी व सांयकाळी पालिका व खासगी शाळेत ये-जा करणारी मुले-पालकही याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. ठिसूळ व धोकादायक फांद्या पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना नेरूळ प्रभाग ९६ मधील सेक्टर १६,१६ए व १८ मध्ये वृक्षछाटणीचे निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली आहे.