नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहासाठी जलवाहिनीसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यावर डांबरीकरण न करता केवळ माती व वाळू टाकून केलेल्या निकृष्ठ कामाबाबत ठेकेदाराला समज देवून संबंधित ठिकाणी डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत बनविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून १८ एप्रिल रोजी केली होती. या रस्त्यावर खडी-दगडीमुळे अपघात झाल्यास संबंधित ठेकेदारावर व महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिला होता. महादेव पवारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने अवघ्या आठच दिवसांमध्ये संबंधित रस्त्यांची डागडूजी करताना सोमवारी (दि. २४ एप्रिल) डांबरीकरणास सुरुवात केली आहे.
महापालिका प्रशासनाने पाण्याची समस्या पाहता प्रशासकीय राजवटीत नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावादरम्यान असणाऱ्या झुलेलाल मंदिर ते पामबीच सर्व्हिस रोडदरम्यानच्या डांबरी रस्त्यावर जानेवारी २०२३ मध्ये खोदकाम केले होते. तथापि हे खोदकाम बुजविताना डांबरीकरण न करता केवळ माती व खड्डूी टाकून रस्ता बुजविण्याची थुंकपट्टी करण्यात आली आहे. या घटनेला अडीच तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. या ठिकाणाहून जाताना अनेक दुचाकी घसरून पडल्या असून दुचाकीचालकांना दुखापती झाल्या आहेत. अनेक महिलांच्या हातांनाही विशेषत: हाताच्या कोपऱ्यांना चांगल्या जखमा झाल्या आहेत. या रस्त्यावरील खोदकामाच्या थुंकपट्टीविषयी संबंधित ठेकेदाराला जाब विचारून रस्त्यावर खोदकाम झालेल्या ठिकाणी माती व खड्डी टाकली त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देवून अपघात टाळण्यास मदत करावी, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महादेव पवार यांनी म्हटले होते.
हेच चित्र नेरूळ सेक्टर सहामधील सागरदिप ते एव्हरग्रीन सोसायटीदरम्यान पाण्याची वाहिनी टाकताना रस्त्यावर खोदकाम करण्यात आले होते. तेथेही खोदकाम करण्यात आले होते. हे खोदकाम बुजविताना तेथेही माती व खड्डी टाकून थुकपट्टी करण्यात आली आहे. येथेही दुचाकी घसरण्याचे व चालकांना जखमा होण्याचे प्रमाण दिवसांतून तीन ते चार वेळा होत असल्याने सिडको सदनिकाधारकांना खोदकाम बुजविताना वापरलेल्या खडीमुळे किंमत मोजावी लागत आहे. याही ठिकाणी रस्त्याची व्यवस्थित डागडूजी करून त्यावर डांबरीकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत. लोकांना पाणी मिळाले, पण त्या पाण्यासाठी आज अपघाताची किंमत चुकवावी लागत आहे. प्रशासनाने पाणी दिले पण ठेकेदाराने खड्डा बुजविताना दाखविलेल्या माती व खडी वापरल्याने दुचाकीचालकांना हातपाय मोडून घेण्याची वेळ आली आहे. आपण प्रशासनातील संबंधितांना तातडीने दोन्ही ठिकाणी रस्त्यांची डागडूजी करण्याचे निर्देश द्यावेत. या ठिकाणी अपघात घडल्यास कोणी जायबंदी झाल्यास अथवा मृत झाल्यास संबंधित डागडूजी करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
महादेव पवारांनी यासंदर्भात दिलेले पत्र व छापून आलेल्या बातम्या प्रभाग ३४ मध्ये व्हायरल केल्यावर समस्येचे गांभिर्य स्थानिक रहीवाशांच्या निदर्शनास आले. सोमवारी सकाळी खोदकाम केलेल्या संबंधित ठिकाणी डांबरीकरणाच्या माध्यमातून डागडूजीस प्रारंभ झाला आहे. महादेव पवारांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक भागातील महत्वाच्या समस्येचे निवारण झाल्याने रहीवाशांनी महादेव पवारांच्या कार्यालयात येवून त्यांचे आभार मानले आहेत. कोणतेही पद नसताना केवल नि:स्वार्थी जनसेवेसाठी महादेव पवार कार्यरत आहेत व लोकांची कामे करत आहेत अशी स्तुतीसुमने लोकांनी व्यक्त केली.