स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील पथदिव्यांची तपासणी करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील पथदिव्यांची तपासणी करण्याची लेखी मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील, उद्यानातील , क्रिडांगणातील पथदिव्यांची तपासणी करणे आवस्यक आहे. ज्या ठिकाणी पथदिपातील दिवे बंद पडले आहेत अथवा अंधूक प्रकाश देत आहेत, त्या पथदिव्यातील दिव्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. पथदिव्याच्या केबल्सची तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यास सदोष विद्युत केबल्स पसरून जिवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळीपूर्व कामांमध्ये आपण गटारांची सफाई करतो, वृक्षछाटणी करतो, त्याचधर्तीवर पथदिव्यांची तपासणी करण्याचे, विद्युत दिवे बदलण्याचे, केबल्सची डागडूजी करण्याचे संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.