श्रीकांत पिंगळे :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी व सफाई करणे आवश्यक आहे. अनेकदा पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्याची झाकणे बाजूला पडतात अथवा त्या झाकणातून पाणी बाहेर पडत असते. पावसाच्या पाण्यात हेही पाणी वाहत असल्याने परिसरातील रहीवाशांना, पादचाऱ्यांना तसेच ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अनेकदा त्या वाहिन्यातून मलही रस्त्यावर विखुरलेले असते. नवी मुंबईसारख्या शहराला ही बाब भूषणावह नाही. पावसाळीपूर्व कामांमध्ये आपण गटारांची सफाई करतो, वृक्षछाटणी करतो, त्याचधर्तीवर पावसाळ्यापूर्वी वरिल परिसरातील रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी करून सफाई करावी. जिथे जिथे चोकअप असेल तो काढण्यात यावा. जेणेकरून पावसाळ्यात स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करण्याची व आजारी पडण्याची वेळ येणार नाही. आपण संबंधितांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.