स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १९ व नेरूळमधील उत्कर्ष जेष्ठ महिला मंडळाचा ११ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमेच्या दिवशी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते रविंद्र इथापे व माजी नगरसेविका सौ. सुरेखा इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत संप्पन्न झाला.
यावेळी रविंद्र इथापे मार्गदर्शन करताना सांगितले की, आज गुरूपोर्णिमा आहे व समोर बसलेल्या सर्व जेष्ठ महिला व नागरिक हे मला गुरूसमान आहेत. या उत्कर्ष महिला मंडळास माझ्या माध्यमातून महिलांसाठी विरंगुळा केंद्र मदर तेरेसा उद्यानात देऊ शकलो. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसेच आपल्या मागणीनुसार अनेक विरंगुळ्याची साधने आपणास उपलब्ध करून दिली आहेत व आवश्यकतेनुसार आणखीही देण्यात येतील. गेल्या अकरा वर्षापासुन उत्कर्ष जेष्ठ महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम व अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असता म्हणुन मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्वाती फडके, उपाध्यक्षा सौ. प्रतिभा कुलकर्णी, सचिव सौ. स्मिता माढेकर, खजिनदार सौ. नमिता वाडकर यांचे मी अभिनंदन करतो व आपल्या मंडळाच्या सर्व सदस्यांस व जमलेल्या शेकडो भगिनीस मनपूर्वक शुभेच्छा देतो असे रविंद्र इथापे यांनी सांगितले.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सेक्रेटरी प्रभाकर गुमास्ते हेही उपस्थित होते. यावेळेस ‘अनहद’ हे ललितबंध अभिवाचन हा कार्यक्रम झाला. त्याचे अभिवाचक योगेश केळकर व वंदना गुजरे उपस्थित होते.