Navimumbailive.com@gmail.com ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ परिसरात होत असलेल्या चोऱ्याचा बंदोबस्त करणेबाबत तसेच परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन परिसरात एलआयजी परिसरात गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रकार वाढीस लागले आहे. एलआयजी परिसरात रात्रीच्या वेळी होत असलेल्या चोऱ्या, घरफोड्या यामुळे स्थानिक रहीवाशी भयभीत झाले आहेत. या चोरांचा लवकर लवकर छडा लागणे आवश्यक आहे. अन्यथा अजून चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. आपण या ठिकाणी गस्त वाढवावी. पोलीस गस्त वाढल्यावर चोऱ्यांच्या घटनांना आळा बसेल आणि चोरांचाही शोध लागेल. सध्या रहीवाशी चोऱ्यांच्या घटनांनी भयभीत झाले असल्याने त्यांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.