Navimumbailive.com@gmail.com – संपर्क : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २ मधील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद होते. ते सुरू करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत समस्येचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पालिका प्रशासनाने या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना पथदिवे सुरू केल्याने सांयकाळनंतर या भागात पूर्वीसारखा अंधार नसल्याने स्थानिक रहीवाशी पांडुरंग आमले यांच्या कार्याची प्रशंसा करू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सानपाडा सेक्टर २ मधील पथदिवे बंद असल्याने ते पुन्हा सुरू करण्याची तक्रार स्थानिक रहीवाशांनी सानपाडा नोडमधील भाजपचे नेते पांडुरंग आमले यांच्याकडे केली. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे लेखी निवेदनातून समस्या मांडली. या परिसरात पथदिवे बंद असल्याने सांयकाळनंतर येथे अंधार पसरतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अंधाराचा फायदा घेवून समाजविघातक शक्ति महिलांची, मुलींची छेडछाड करण्याची भीती होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांची अथवा पादचाऱ्यांची अंधाराचा फायदा घेत लुटमार होण्याची शक्यता होती. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पांडुरंग आमले यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. एका निवेदनाने तृप्त न होता पांडुरंग आमले यांनी सातत्याने लेखी पाठपुरावा केला. पालिका प्रशासनाने पांडुरंग आमलेंच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना सानपाडा सेक्टर दोनमधील नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती केल्याने येथील अंधाराची समस्या संपुष्ठाय आली. स्थानिक रहीवाशी पांडुरंग आमले यांची भेट घेत समस्या निवारणाबाबत आभार मानत त्यांच्या कार्याची प्रशंसा करू लागले आहेत.