Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : इरर्शाळवाडीच्या घटनेने महाराष्ट्राची झोप उडाली आणि आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकरच्या कुशीतील माळीण दुर्घटनेच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. इरर्शाळवाडीच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने अथक प्रयत्न सुरू केले. अधिवेशन असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सरकारची अधिवेशनकालीन जबाबदारी सोपवून इर्शाळवाडीत तळ ठोकून होते. सर्वच पक्षाचे नेतेमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. मग मदतीसाठी नवी मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकारी कशा मागे राहतील? संवेदनशील असणाऱ्या या महिला पदाधिकाऱ्यांनी इरर्शाळवाडीतील आपल्या बांधवांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आणि आज त्याचीच चर्चा नवी मुंबईत होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, तसेच माजी जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील व जिल्हा महामंत्री विजय घाटे (माऊली) यांचा नेतृत्वाखाली व महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गाताई ढोक वं भाजयुमोच्या नवी मुंबई युवती अध्यक्ष सौ. सुहासिनी नायडू यांच्या पुढाकारांनी महिला आघाडीने इरर्शाळवाडीच्या बांधवांना मदतीचा हात देण्याची जबाबदारी उचलली.
इर्शालवाडी येथील नागरिकांसाठी स्वतःला प्रमुख महिला पदाधिकारी उपाध्यक्षा सौ. विजया घरत, महामंत्री सौ. उज्वला जगताप, महामंत्री कल्पना छत्रे, छाया खटकर, आज्ञा गव्हाणे, वळवयकर, मंडळ अध्यक्ष सौ. शीतल भोईर, सुवर्णा होस्मानी, कोमल खिलारी यांच्या माध्यमातून पीडिताना ब्लॅंकेट, चटई, साडी, महिलांना मॅक्सी, पुरुषांना बर्म्युडा व टी-शर्ट, तसेच इनर वेअर, खाद्यपदार्थ, तांदूळ, गहू, साखर, बेसन पीठ, तसेच महिलांना पुरुषांना लहान मुलांना चपल, स्टीलची प्लेट ग्लास, व खाऊ हे स्वतः खालापूर येथे इर्शाळ वाडी इथे जाऊन पिडितांना देऊन ‘एक हात आपल्या कर्तव्याचा, एक हात आपल्या जबाबदारीचा’ या धोरणानुसार वाटप करण्यात आले.