Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे दि. ३१ जुलै रोजी एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन परिसरात एलआयजीसमोर व पालिका मल:निस्सारण केंद्रासमोरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तेथून पुढे गेल्यावर स्वामी समर्थांच्या मठाकडे वळसा घेताना जुई व तिरंगा सोसायटीलगतच्या रस्त्यावर कोपऱ्यावरच बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. जुईनगर नोडमधील अंर्तगत भागात सिडको वसाहत, साडे बारा टक्के वसाहत तसेच ग्रामीण भागातील रस्त्यावरही तसेच नेरूळ सेक्टर दोन परिसरातील अंर्तगत रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे परिसराला बकालपणा आला असून येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर खड्यात साचलेले पाणी उडत असते. या रस्त्यावरुन ये-जा करताना वाहनचालकांना व वाहनातील अन्य प्रवाशांना खड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येनिवारणासाठी आम्ही आपणास यापूर्वीही निवेदन दिलेले आहे. खड्यामुळे सायकलस्वार अथवा दुचाकीचालकांचे अपघात घडू लागले आहेत. आपण या ठिकाणी पाहणी अभियान राबवावे, आम्ही आपणास नेरूळ सेक्टर दोन आणि चार तसेच जुईनगर नोडमधील रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवितो. समस्या गंभीर आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे लोकांना अतोनात त्रास होत असून पालिका प्रशासनाबाबत रहीवाशी संताप व्यक्त करू लागले आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना तात्काळ या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडूजी करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.