Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील रस्त्यांची अवस्था पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपणास लेखी निवेदनातून कळविली होती आणि पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून प्रशासनाने तातडीने या परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांची डागडूजी करावी अशी मागणीही केली होती. सध्या पावणे दोन महिने चांगलाच मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नेरूळ सेक्टर १८ मधील शिवाजी चौक ते सेक्टर २० मधील ठाकूर चौक यादरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. येथून येजा करताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. ये-जा करणाऱ्या रहीवाशांच्या अंगावर वाहनांमुळे त्या खड्यातील पाणी अंगावर पडत आहेत. यामुळे परिसराला बकालपणा आला असून खड्यामुळे सभोवतालच्या परिसरात डास वाढले असल्याच्या तक्रारी रहीवाशांकडून करण्यात येत आहेत. हे खड्डे न बुजविल्यास खड्डे चुकविताना दुचाकी वाहन घसरून दुर्घटना होण्याची भीती आहे. आपण समस्येचे गांभीर्य पाहता नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर असणारे खड्डे तातडीने बुजविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.