नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील राजमाता जिजाऊ उद्यानात शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून मॉर्निग वॉकच्या पायवाटेवर तसेच ओपन जीम भागात महापालिका प्रशासनाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली आहे. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव या प्रभाग ८६चे कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाकडे ब्लिचिंग पावडर टाकण्याविषयी पाठपुरावा केला होता. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पाठपुराव्याची दखल घेत पालिकेच्या संबंधितांना या उद्यानात ब्लिचिंग पावडर टाकण्याचे निर्देश दिले.
नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर गेली दोन महिने सतत पडणाऱ्या पावसामुळे शेवाळ साचण्यास सुरूवात झाली आहे. पदपथ निसरडे झाल्याने रहीवाशी पदपथावरून चालताना घसरूनही पडले आहेत. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव या प्रभाग ८६चे कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनातून पाठपुरावाही केला होता. आयुक्तांनीही संबंधितांना या समस्येचे निवारण करण्यासाठी निर्देशही दिले. तथापि कार्यवाही झालीच नाही.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये असणाऱ्या राजमाता जिजाऊ उद्यानात मॉर्निग वॉकला तसेच ओपन जीमसाठी येणारे रहीवाशी व विशेषत: महिला पायवाटेवरील लाद्या शेवाळामुळे निसरड्या झाल्याने घसरून पडण्याच्या घटनाही दोन-तीन दिवसांत घडल्या. प्रभाग ८६चे कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळीच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना थेट त्यांच्या व्हॉटसअपवरच लेखी निवेदन सादर करत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. महापालिाक आयुक्त नार्वेकर यांनी या निवेदनाची दखल घेत तातडीने या उद्यानातील मॉर्निग वॉकच्या पायवाटेवर तसेच ओपण जीमच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. आयुक्तांच्या आदेशामुळे तातडीने उद्यानात ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी स्वत: जीवन गव्हाणे यांना ब्लिचिंग पावडर टाकलेले फोटोही पाठविले. कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांच्यामुळे ही समस्या मार्गी लागल्याने स्थानिक रहीवाशी जीवन गव्हाणे आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आभार मानत आहेत.