Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात पिण्याचे पिवळसर दूषित पाणी येत असून पाणी कमी दाबाने येत असल्याची लेखी तक्रार सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचे कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना आणि सारसोळे गावच्या ग्रामस्थांना पिवळसर स्वरूपातील दूषित पाणी येत आहे. काही ठिकाणी खूप वेळानंतर चांगले पाणी येते तर काही ठिकाणी तेच पिवळसर पाणी येत आहे. सिडको वसाहत, साडेबारा टक्के भुखंडावरील इमारती तसेच गावठाणातील इमारती रहीवाशी व ग्रामस्थ या दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच साडे बारा टक्के भुखंडावरील इमारतींमध्ये आजही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. आपण या परिसरात पाणीपुरवठा काम पाहणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची समस्या दूर करण्याचे व कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचे कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
जीवन गव्हाणे यांनी यापूर्वी याव विषयावर महापालिका आयुक्तांकडे दि. ३१ जुलै रोजी तक्रार केली होती. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ती तक्रार निवारणासाठी City Engineer <cityengineer@nmmc.gov.in>,, Executive Engineer Nerul <ee_nerul@nmmc.gov.in>,, Addl City Engineer Civil <addl_ce_civil@nmmc.gov.in>, Executive Engineer Water Supply ee_water@nmmc.gov.in यांना फॉरवर्डही केली. परंतु समस्येचे निवारण झाले नाही. पाणी कमी दाबाने येते व पिवळसर तर कधी काळपट येत असल्याचे जीवन गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.