नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील महापालिकेच्या नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगणात नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ सेक्टर सहामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा शुभारंभ शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी करण्यात आला.
सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा समावेश असलेल्या महापालिका प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी या स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. कालच जीवन गव्हाणे यांच्या प्रयत्नामुळे महापालिका प्रशासनाने येथील उद्यान व क्रिडांगणात ब्लिचिंग पावडरची फवारणी केली होती.
शनिवारॅी सकाळी ६. ३० वाजताच या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी अभियान शुभारंभाला यावेळी शुभेच्छा दिल्या. वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी सकाळी ९ वाजेपर्यत क्रिडांगणात स्वच्छता अभियान राबविले. क्रिडांगणावरील एका भागाचे जंगली गवत काढून ते क्रिडांगणाबाहेरील पदपथावर एका कोपऱ्यात ढिगारे रचून ठेवले. यावेळी प्रभागातील समाजसेवक तुकाराम टाव्हरेसर यांनी अभियानाला उपस्थित दर्शविताना आपल्या छोटेखानी भाषणातून या उपक्रमाची प्रशंसा करताना जीवन गव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसा केली.
आगामी शनिवारी, १९ ऑगस्ट २०२३ रोजी पुन्हा त्याच क्रिडांगणावर कॉंग्रेस पक्षाकडून स्वच्छता अभियान जीवन गव्हाणे यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी दिली. अभियान आयोजनासाठी गणेश इंगवले, वैभव इंगवले, रोहन इंगवले यांनी परिश्रम घेतले.