गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुरीकरण करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. सानपाडा नोडमधील सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसर, सानपाडा कॉलनीमध्ये ताप, मलेरिया , डेंग्यू या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आडळून येत आहेत. डासांचा उद्रेक वाढला आहे. सकाळी अथवा सांयकाळी डासांच्या त्रासामुळे लोक त्रस्त झाले आहेत. सांयकाळी ६ नंतर घराची दारे-खिडक्या बंद करून घेण्याची वेळ आलेली आहे. सोसायटी आवारातही लोकांना फिरता येत नाही. आपण समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना सानपाडा गाव, सानपाडा कॉलनी आणि सानपाडा पामबीच परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत आवारात धूरफवारणी करून डासांची समस्या संपुष्ठात आणण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.