गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सफाई कर्मचारी आणि वीर जवान यांना राखी बांधुन कॉंग्रेसच्या वतीने रक्षा बंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी नवी मुंबई सचिव विद्या भांडेकर यांच्या पुढाकाराने नेरुळ सेक्टर दोन येथील जनसंपर्क कार्यालयात नवी मुंबई मनपामधील साफसफाई कर्मचारी. तसेच सैन्य दलातील वीर जवान यांना राखी बांधुन अनोख्या पद्धतीने रक्षा बंधन उत्सव साजरा करण्यात आला.
नेरुळ सेक्टर २ मधील कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयात हिंदू धर्मियांचा पवित्र सण बंधन, नवी मुंबई कॉंग्रेस सचिव विद्या भांडेकर, पूनम साळुंखे, दिपाली खरट, कल्पना वाघमारे, सीमा वाघ, रेश्मा पवार, रुपाली साळुंखे आदी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी महापालिकेचे सफाई कामगार, मुषक विभागातील कर्मचाऱ्यांना राखी बांधुन सण उत्साहात साजरा केला. तसेच सैन्य दलातील वीर जवानांनाही यावेळी राखी बांधण्यात आली. यावेळी सचिव विद्या भांडेकर यांनी बोलताना सांगितले की, नवी मुंबई शहराची साफसफाई करणारे महापालिकेचे कर्मचारी हे स्वच्छता दूत असल्याने त्यांना राखी बांधुन तसेच सैन्यदलातील जवान यांना राखी बांधुन रक्षा बंधन उत्सव कॉंग्रेसच्या वतीने साजरा करण्यात आल्याचा आनंद असल्याचे सांगितले.