गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मुंबईतील वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून नेरूळमधील अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल महिलांना मोफत रिक्षाचे ट्रेनिंग देणार असून आतापर्यत ९७ महिलांनी या उपक्रमासाठी नावनोंदणी केली असून महिलांना रिक्षा ट्रेनिंग सुरूही झाले असल्याची माहिती अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल समुहाचे अध्यक्ष दिलिप आमले यांनी दिली.
शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्या यांच्या विशेष माध्यमातून वात्सल्य ट्रस्ट मुंबईचे डॉ. गौरव म्हस्के मोफत रिक्षा ट्रेनिंग कोर्स सुरू झाला असून या उपक्रमासाठी नवी मुंबईतील महिलांनी नाव नोदणी करावी असे आवाहन दिलीप आमले यांनी केले आहे.