गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महावितरणच्या डीपीलगत पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणेबाबत तसेच महावितरणच्या आवारातील झाडांच्या बाहेर आलेल्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्याची लेखी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या शिवम व सागरदीप सोसायटीच्या लगत तसेच मेरेडीयन व शिवालिक सोसायटीसमोर महावितरंणची विद्युत डीपी आहे. या विद्युत डीपीच्या आवारात अनेक झाडे आहेत. शिवम सोसायटीच्या मंदीरालगतच्या प्रवेशद्वारालगत तसेच शिवालिक सोसायटीच्यासमोर झाडांच्या फांद्या थेट पदपथापर्यत झुकल्या आहेत. पदपथावरून ये-जा करणाऱ्या त्या फांद्यांचा त्रास होत आहे. तसेच मेरेडियन सोसायटीच्या विरूद्ध दिशेला महावितरणच्या पदपथावर असलेला महापालिकेचा दिशादर्शक फलकही या झाडांच्या फांद्यामुळे झाकला गेला आहे. कालच्या पावसात महावितरणच्या आवारातील झाडांच्या फांद्या वाऱ्यामुळे पदपथावर पडल्या आहेत. पदपथ चालण्यासाठी बंद झाला आहे. आपण संबंधितांना त्या फांद्या तात्काळ हटविण्याचे तसेच पदपथावर आलेल्या व झुकलेल्या फांद्या तात्काळ छाटण्याचे आदेश द्यावेत अन्यथा त्या फांद्या कोणा बालकाच्या अथवा ज्येष्ठ नागरिकावर पडल्यास दुर्घटना होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देवून स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.