स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेकडे मागणी करून नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एनएमएमटी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील विविध ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी लोकनेते आमदार नाईक यांचे आभार मानले आहेत.
आजपासून (१३ नोव्हेंबर) ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना एनएमएमटीच्या विनामूल्य बस प्रवासाची सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठांना ओळखपत्र देण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाच्या धर्तीवर नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना देखील नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेस मधून विनाशुल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना लोकनेते आमदार नाईक यांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार अलीकडेच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यासंबंधीची घोषणा केली. लोकनेते आमदार नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीची ही अनोखी भेटच दिली आहे, अशा प्रतिक्रिया जेष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.
वास्तल्य ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था करावे गाव तसेच सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संस्था सीवूड या संघटनांच्या सदस्यांनी सोमवारी लोकनेते आमदार नाईक यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. वात्सल्य ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील,करावे गावचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे,प्रभाग क्रमांक १११चे माजी नगरसेवक गणेश म्हात्रे,करावे गावचे पोलिस पाटील लीलाधर तांडेल, बाबाजी तांडेल, परशुराम पाटील, केसरीनाथ कडू, दीनानाथ मढवी, रामचंद्र भोईर,रतिलाल तांडेल, नामदेव मढवी, विवेक तांडेल, सेवाधारी जेष्ठ नागरिक संघटना सिवुडसचे अध्यक्ष अशोक कुंडे,सचिव सीताराम रोकडे,अनिल सोरते यांनी लोकनेते नाईक यांना नवी मुंबईतील तमाम जेष्ठ नागरिकांच्या वतीने धन्यवाद दिले.