स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसच्या माध्यमातून जनसेवेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चालक, वाहक, वाहतुक नियत्रंक, लिपिक व इतर कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाला तसेच ठोक मानधनावरील वाहक व चालकांना तसेच ठोक मानधनावरील इतर कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता तात्काळ देण्याची मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि परिवहन व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षाच्या कालावधीत महापालिका परिवहन उपक्रमाने मौल्यवान कामगिरी चालक, वाहक, वाहतुक नियत्रंक, लिपिक व इतर कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाला तसेच ठोक मानधनावरील वाहक व चालकांना तसेच ठोक मानधनावरील इतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे केलेली आहे. कोरोना काळात नवी मुंबईकरांना प्रवासी सुविधा अहोरात्र परिवहन उपक्रमाने दिलेली आहे. याशिवाय कोरोना रुग्णांची कोव्हिड सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी एनएमएमटीच्या बसेसने रुग्णवाहिकेसारखे अहोरात्र काम केले आहे. महापालिका प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या परिवहन विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्वच आस्थापनेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना कोव्हिड भत्ता दिलेला आहे. इतकेच नाही तर सुरक्षेचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही कोव्हिड भत्ता मिळालेला आहे. तथापि कोव्हिड कालावधीत प्रवासी सुविधा पुरविण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या महापालिका परिवहन उपक्रमातील (एनएमएमटी) प्रशंसनीय कार्य चालक, वाहक, वाहतुक नियत्रंक, लिपिक व इतर कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाला तसेच ठोक मानधनावरील वाहक व चालकांना तसेच ठोक मानधनावरील इतर कर्मचाऱ्यांना आजतागायत महापालिका प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता मिळालेला नाही. ज्यांनी कोव्हिड काळात प्रवासी सुविधेचे व रुग्णांच्या ने-आण करण्याचे काम केले ते चालक – वाहक आणि प्रवासी सुविधेचे तसेच बसेसचे संचलन, नियत्रंण करणाऱ्या चालक, वाहक, वाहतुक नियत्रंक, लिपिक व इतर कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाला तसेच ठोक मानधनावरील वाहकचालकांना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाची दखल महापालिका प्रशासनाने घेणे आवश्यक होते. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक आहे. याउलट महापालिका प्रशासनाने त्यांना आजही कोव्हिड भत्यापासून वंचित ठेवून त्यांच्या कार्याचा एकप्रकारे अपमानच केला असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
या सर्वांना महापालिका प्रशासनाने कोव्हिड भत्ता देण्यासाठी आम्ही सातत्याने महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावाही केलेला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनात या सर्व घटकांना कोव्हिड भत्ता मिळावा यासाठी चपलाही झिजविल्या आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाने फाईलही बनविल्या होत्या. तथापि पुढे त्या फाईलचे काय झाले तेच समजले नाही? आपण वस्तूस्थिती लक्षात घेता महापालिका परिवहन उपक्रमातील आजही कोव्हिड भत्यापासून वंचित असलेल्या चालक, वाहक, वाहतुक नियत्रंक, लिपिक व इतर कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाला तसेच ठोक मानधनावरील वाहक व चालकांना तसेच ठोक मानधनावरील इतर कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता तात्काळ देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.