स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई: नेरूळ सेक्टर सहामधील महापालिका उद्यानाच्या कोपऱ्यात असलेल्या सार्वजनिक शौचालयातील दुर्गंधीच्या समस्या संपुष्ठात आणण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यान व क्रिडांगणात प्रवेश करतानाच महापालिकेचे एक सार्वजनिक शौचालय आहे. सकाळच्या वेळी या सार्वजनिक शौचालयातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असते. सकाळी उद्यानातील ओपन जीममध्ये व्यायाम करण्यासाठी तसेच मॉर्निग वॉक करण्यासाठी स्थानिक रहीवाशी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. त्या सर्वांना या शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मॉर्निग वॉक करणारे शौचालयाच्या पाठीमागच्या बाजूने चालताना वास टाळण्यासाठी पळत असतात. सारसोळे गावचे ग्रामस्थही याच मार्गाने खाडीकडे सकाळच्या वेळी जात असतात. शौचालयाच्या बाजूने जाताना त्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिका प्रशासनाने समस्येचे गांभीर्य टाळण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येचे तातडीने निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.