संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला. त्यानुसार त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज सर्व सामान्य रुग्णांना व वैदकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे फायदा होणार आहे व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांना व तरुणींना यांना मोठा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे अंतिम सादरीकरण करण्यात आले असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मे महिन्याच्या शुभ मुहर्तावर सदर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी अंतिम बैठकीत सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त-२ विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (मालमत्ता विभाग) राहुल गेठे, सहाय्यक नगररचना अधिकारी सोमनाथ केकाण, शहर अभियंता संजय देसाई, वैदकीय आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सदरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे ८.४० एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे ८१९.३० ते ८५० कोटी खर्च येणार आहे. तसेच सदर हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही ५०० बेड हून अधिक असून हॉस्पिटल पूर्णत: सर्व सुविधयुक्त बनणार आहे. तसेच सदर उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महापालिकाचे असणार आहे. तसेच लवकरच सिडको प्राधिकरण यांच्या बरोबर करार होणार असून निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राज्य सरकार, सिडको आणि महापालिकेकडून लागणाऱ्या सर्व मान्यता आणि मंजुरी, परवानग्या मिळाल्याने निविदा प्रकियेला नवी मुंबई महापालिकेकडून सुरुवात होणार आहे. तसेच शासन दरबारी, सिडकोकडे पाठपुरावा केल्यामुळे नवी मुंबईकरांना आरोग्य सेवा मिळणार आहेत. शिवाय वैदकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. सदर हॉस्पिटलची वास्तू ही तळमजलासह ७ मजल्याचे असून ४०० हून अधिक वाहन तळाची व्यवस्था होणार आहे. हृदय, मेंदू अश्या अनेक मोठ मोठ्या आजारांवर सेवा दिली जाणार आहे. तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीची तसेच सदर हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही ५०० बेड हून अधिक असून हॉस्पिटल पूर्णत: सर्व सुविधयुक्त बनणार आहे.
तसेच आजारांवर उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया व इतर सुविधा ह्या प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, पीजी, नर्सिंग शैक्षणिक वस्तीगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रूग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा, नर्सिंग वस्तीगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर वस्तीगृह, व इतर अनेक सुख-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सर्व नवी मुंबईतील नागरिकांना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे हे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हा नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. तसेच नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होणार आहे. गेल्या एक वर्षापासून या कामासाठी जो लढा सुरु होता त्या लढ्याला खऱ्या अर्थाने एक प्राप्त स्वरूप महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांनी दिला त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले असून सर्वांकडून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे.