सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम पीआर एजंन्सी : संपर्क : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सानपाडा भाजप प्रभाग क्रं ३० , साईभक्त सेवा मंडळ आणि साईभक्त महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल एक महिनाभर सानपाडावासियांकरता चुंबकीय निसर्गोपचार सुजोक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपच्या बेलापुर मतदारसंघातील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून व साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदाताई पांडुरंग आमले व त्यांच्या महिला सहकारी तसेच साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले व त्यांचे सहकारी यांच्या परिश्रमातून २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या सानपाडा सेक्टर ३ मधील साईसंगत बिल्डींग शॉप क्रं ३ येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० ते सांयकाळी ६.३० वाजेपर्यत हे शिबीर डॉ. विनोद गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये ताप, संधीवात, गुडघेदुखी, दमा (अस्थमा), डायबेटीस, ब्लड प्रेशर कमी जास्त, हद्यविकार,व्हॉल्व प्रॉब्लेम, मुळव्याध, हर्निया, डोकेदुखी, चक्कर येणे, डोळे, कान, घसा, मान, नाक दुखणे, लठ्ठपणा, पोटाचे विकार, स्त्री-पुरुषांची लैंगिक समस्या व इतर अशा १७२ विकारावर चुंबकीय निसर्गापचार अॅक्युप्रेशर सुजोक व ओबीसीएम मशिनद्वारे उपचार केले जातात. या शिबीरासाठी अधिक माहितीसाठी पांडुरंग आमले, रमेश शेटे, विश्वास कणसे, श्रीपाद पत्की, नाना शिंदे, सौ. शारदाताई पांडुरंग आमले, सौ. वैशाली होळकर, सौ. स्वाती कदम, सौ. सोनल राणे, सौ. विमल पाटील यांच्याशी संपर्क साधावा. या शिबीरासाठी कक्षप्रमुख म्हणून सौ. सुचिता शेटे, सौ. मंगल वाव्हळ, सौ. संचिता जोईल, सौ. प्रतिभा पवार, सौ. सुलोचना निंबाळकर, सौ. नीता आंग्रे, सौ. दिशा केणी, सौ. हेमा पवार, सौ. स्वाती हाडवळे, सौ. नंदा चौधरी, सौ. सानिका शेडगे आदी कार्यरत आहेत. सानपाडावासियांना या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्या शरीर स्वास्थ्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदाताई पांडुरंग आमले आणि साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांनी संयुक्तपणे केले आहे.