स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
- सारसोळे मच्छीमार्केट करिता ७७ लाख रुपये मंजूर
- शनिवारी ‘मच्छीमार्केट’चे भूमिपूजन होणार
नवी मुंबई : सारसोळे गावचे मच्छिमार्केट हे गेल्या काही वर्षांपासून बकालपणाचे व समस्यांचे आगारच बनले होते. त्यातच भरीस भर म्हणून बाराही महिने या मच्छिमार्केटच्या सभोवताली अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा विळका पहावयास मिळत आहे. परंतु आता लवकरच सारसोळे गावच्या मच्छिमार्केटचे चित्र बदली झालेले पहावयास मिळणार आहे. आमदार मंदाताई म्हात्रे या गेल्या काही वर्षांपासून सारसोळे ग्रामस्थांकरीता आपला निधी खर्च करत असल्याने मंदाताई म्हात्रे येथील ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईतच बनल्या आहेत.
नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच नवी मुंबई शहर हे सर्व सुविधायुक्त म्हणून नावारूपास आहे. परंतु नवी मुंबईतील गावठाणांचा विकास व्हावा या करिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे या तत्पर कार्यशील असतात. याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीमधून तब्बल रक्कम ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून सारसोळे गावातील स्थानिक मच्छीमार बांधवाकरिता मच्छीमार्केट उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन सोहळा शनिवार दि. २५ नोव्हेंबर 2023 रोजी, सांयकाळी ५ वाजता स्थळ सेक्टर- ६, सारसोळे गाव मच्छीमार्केट येथे पार पडणार आहे.
यावेळी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, सारसोळे गावातील मच्छीमार्केट हे पूर्ण मोडकळीस अवस्थेत असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सारसोळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी माझ्या कार्यालयात येऊन सदरचे मच्छीमार्केट हे आपल्या आमदार निधीमधून बांधून देण्यात यावे अशी विनंती केली होती त्या अनुषंगाने माझ्या आमदार विकास निधीमधून रक्कम ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून सदर सर्व सुविधायुक्त असा मच्छीमार्केटची वास्तू उभारण्यात येणार आहे.
तसेच त्यांनी सांगितले की, नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून “दिवाळे गावाकडे पाहिलं जात त्याच प्रमाणे नवी मुंबईतील संपूर्ण गावठाणांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन माझा आगरी-कोळी बांधव हा कुठल्याच सोयी सुविधांपासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईतील सारसोळे ग्रामस्थांना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य सुसज्ज सर्व सुविधायुक्त असा मच्छीमार्केट पहावयास मिळणार आहे.
तसेच सारसोळे मच्छिमार्केट करिता ७७ लाख रुपये मंजूर करून दिल्याबद्दल आदरणीय सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सारसोळे ग्रामस्थांकडून विशेष सत्कार ही करण्यात येणार आहे.
यापूर्वी विधान परिषद आमदार असताना मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपये खर्च करताना सारसोळे जेटीवरील पायऱ्यांचे काम केले होते. न्हावाशेवा लिंक ब्रीजमुळे सारसोळे गावातील मच्छिमारांच्याही मासेमारीवर परिणाम होणार असल्याचे गांभीर्य पाहता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अन्य गावातील मच्छिमार ग्रामस्थांसमवेत सारसोळे गावातील मच्छिमार ग्रामस्थांना शासकीय मदत मिळवून दिली आहे. सारसोळे ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात गेल्या काही वर्षांमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे.
तरी सर्व नवी मुंबईतील नागरिकांनी “भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी” शनिवार दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी, सांयकाळी ५ वाजता स्थळ सेक्टर- ६, सारसोळे गाव मच्छीमार्केट येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.
०००
एक प्रकारची कौंटूबिक सेवाच
आमदार मंदाताई म्हात्रे आणि सारसोळे गावाचे एक रक्ताचे नाते आहे. मंदाताई म्हात्रे यांचे यजमान उद्योजक विजय म्हात्रे यांचे सारसोळे हे आजोळ आहे. सारसोळे गावच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांपासून योगदान देताना मंदाताई म्हात्रे एकप्रकारे आपल्या सासूच्या माहेरच्या विकासासाठी प्रयत्न करताना सासूबाईंची सेवा करत असल्याची प्रतिक्रिया सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सारसोळे गावच्या विकासासाठी कार्य करताना आमदार मंदाताई म्हात्रे ही आपली कौंटूबिक सेवाच असल्याचे नम्रपणे सांगत आहेत.