संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
मनसेच्या युनियनने केलील्या मागणी नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून मान्य
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनातील सर्व कंत्राटी कामगारांना १० लाख रुपयांचा कॅश लेस विमा द्यावा अशी मागणी मनसे युनियनचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांनी सोमवारी नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर साहेब यांच्याकडे केली. त्यावर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर मागणी मान्य करत लवकरच विमा कवच देण्याचे मान्य केले आहे.
१० लाखाचे विमा कवच लागू होण्यासाठी १० ते १५ लागतील तोपर्यंत कामगारांचे उपचार मनपा हॉस्पिटलमध्ये मोफत करावे आणि जे उपचार मनपा हॉस्पिटलमध्ये होत नाहीत त्या कामगारांना फोर्टिस हॉस्पिटल मध्ये पाठवावे अशी मागणी संघनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसे युनियनचे सहचिटणीस रणजीत सुतार, विजय राठोड व कामगार उपस्थित होते.