स्वयंम न्युझ ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – सौर ऊर्जाची संपूर्ण माहिती १०० दशलक्षाहून अधिक लोकसंख्या आणि उच्च उर्जेची मागणी असलेली भारत ही वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे. ज्याची पूर्तता भारत सरकार विविध नवीकरणीय आणि अपारंपरिक संसाधनांच्या वापराद्वारे करत आहे. वीज निर्मिती आणि सौरउर्जा वापराच्या बाबतीत आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिक क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी तसेच महिलांच्या संरक्षणाकरिता “विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सोलर हायमास्टकरिता रक्कम २५ कोटी रुपये इतका भरघोष निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सदर सोलर हायमास्ट व सौर पथदिवे बसविणे हे आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हे प्रथमच बसविण्यात येत आहे. तसेच बेलापूर मतदार संघातील जनतेला अक्षय उर्जेचा उपयोग करून बेलापूर मतदारसंघात दिवाळी निमित्त लख्खप्रकाश मिळणार असून जनसामान्य नागरिकांना व विशेषत: महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे वीज बिलात ही कपात होणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदिजी यांनी भारत देशाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रथम सौर उर्जेवर लक्ष केंद्रित केले व केंद्र शासनामार्फत गावागावात, खेड्यापाड्यात व गोरगरिबांच्या घरापर्यंत सौर उर्जा पोहचली पाहिजे हा अजेंडा लक्षात घेऊन या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सौर उर्जेसाठी जो निधी मंजूर केला आहे तो निधी नवी मुंबईच्या विकासाकरिता उपलब्ध व्हावा म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जो पाठपुरावा केला आहे त्याला आजचा घडीस मोठे यश आले आहे. तसेच महाराष्ट्रात प्रथमतः नवी मुंबईकरिता सौर उर्जेसाठी भरघोस निधी आणण्याचा मानस हा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे.
आपल्या देशाची विद्युत निर्मिती दरवर्षी वाढते. परंतु त्याच वेळी आपली लोकसंख्या वाढते, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. सामान्य भाषेत, सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून प्राप्त होणारी ऊर्जा. कारण भारताचा भूभाग अशा ठिकाणी आहे जेथे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात पोहोचतो, तेथे सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त क्षेत्रे आहेत. दरवर्षी प्रचंड प्रमाणात सूर्यप्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतो. सौर उर्जा उपकरणे जवळपास कुठेही स्थापित केली जाऊ शकतात कारण ते इतर उर्जा स्त्रोतांपेक्षा कमी खर्चिक आहेत त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईतील सर्व उद्याने, जेट्टी, शहरातील चौका चौकात किंवा खुली मैदाने, रस्ते अशा विविध ठिकाणी लवकरात लवकर सोलर हायमास्ट बसविण्यात येणार असल्यामुळे रात्रीपालीस कामावर जाण्याकरिता विशेषत: महिलांना व कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच संपूर्ण बेलापूर मतदारसंघ दिवाळी निमित्त लख्खप्रकाशात दिसणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे नवी मुंबईकरांकडून कौतुक होत आहे.