शितल भालेराव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संघटनात्मक कामकाजाचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि पक्ष संघटन विभागाचा संपूर्ण प्रभार नाना गावंडे, उपाध्यक्ष व प्रमोद मोरे सरचिटणीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे त्याबद्दल त्यांचे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या निवडीबाबत अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासोबत नवी मुंबई काँग्रेस रविंद्र सावंत सोबत सानपाड़ा तालुका अध्यक्ष संजय कपूर , रोजगार सेल अध्यक्ष सूरज देसाई , इंटकचे नवी मुंबई उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ,वार्ड अध्यक्ष उत्तम पिसाळ यांनी प्रमोद मोरे याना भेटून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.