शितल भालेराव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानातील धोकादायक अवस्थेत बसविण्यात आलेली खेळणी व्यवस्थित बसविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोनमध्ये महापालिकेचे सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानात नेरूळ सेक्टर दोन आणि जुईनगर नोडमधील लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. रहीवाशी सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी येत असतात. त्या उद्यानातील खेळणी आणि झोपाळे महापालिका प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्याने या खेळण्यांमुळे मुलांच्या जिविताला धोका निर्माण झालेला आहे. झोपाळे, बदक खेळताना कधीही तुटून लहान लहान मुलांना शारीरीक इजा होण्याची भीती विद्या भांडेकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाने ही खेळणी कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने बसविली आहेत, हे आपण स्वत: या ठिकाणी पाहणी अभियान राबविल्यास आपल्या निदर्शनास येईल. झोपाळे आजही केवळ एकाच खिळ्यावर आधारीत आहेत. बदकही धोकादायक अवस्थेत असून तो कलत्या स्वरूपात असून कोणत्याही वेळी तो बदक पडून खेळणाऱ्या मुलांना इजा होवू शकते. उद्यानातील खेळणी चुकीच्या पद्धतीने बसविल्याने ती सुस्थितीत तातडीने बसविणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीच्या व धोकादायक स्थितीत बसविण्यात आलेल्या खेळण्यामुळे स्थानिक रहीवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही खेळणी आहेत का मुलांना जखमी करण्यासाठी उभारलेले सांगाडे आहेत, असा संताप उद्यानात येणाऱ्या रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे, आपण स्वत: या ठिकाणी येवून पाहणी अभियान राबविल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. या उद्यानात चुकीच्या पद्धतीने व धोकादायक अवस्थेत बसविंण्यात आलेली खेळणी सुस्थितीत तातडीने बसविण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.