नवी मुंबई : अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार, दि. २२ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त सुरु असलेल्या ‘गृह संपर्क अभियानां’तर्गत नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये रहिवाशांना घरोघरी जावून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने ‘अक्षता आणि निमंत्रण पत्रिकां’चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी स्थानिक माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत, नवी मुंबई भाजपा चिटणीस गणेश भगत, समाजसेवक मनोहर कातुरडे, अशोक गांडाळ, विकास तिकोणे, राजेंद्र तुरे, रोहित चव्हाण, शुभम पाटणकर, अरुण यादव, ओमकार नवले, शुभम मोरे उपस्थित होते.