अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर नोडमधील रहीवाशांना महापालिकेकडून मालमत्ता कराचे बिल (पावती) भेटत नसल्याने रहीवाशांना विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या रहीवाशांना मालमत्ता कराचे बिल (पावती) वेळेवर देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
जुईनगर नोडमध्ये सिडकोच्या तसेच खासगी साडे बारा टक्केवरील भुखंडावर निर्माण झालेल्या इमारतीमधील रहीवाशांना गेल्या काही महिन्यांपासून मालमत्ता कराचे बिल भेटत नाही. मालमत्ता कर भेटण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून उदासिनता दाखविली जात असल्याने स्थानिक रहीवाशांनी मालमत्ता कराचा पालिका प्रशासनाला मालमत्ता कराचा भरणा करायचा कशासाठी? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जुईनगर सेक्टर २३,२४, २५ मध्ये मालमत्ता कराची समस्या गंभीर झालेली आहे. रहीवाशांना मालमत्ता कर भरण्याबाबतचे बीलच (पावती) पालिका प्रशासनाकडून मिळत नाही. जुईनगर सेक्टर २३,२४, २५ मधील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या, शिवप्रेरणा, साई कृष्ण कुंज, साई साक्षी, श्री कृपा प्रवेंट, साई कृपा निलगिरी या साडेबारा टक्केवरील आणि सिडकोच्या सोसायटींमध्ये मालमत्ता कराचे बिल भेटत नसल्याने रहीवाशांनी याबाबत आमच्या कार्यालयात येवून तक्रारी केल्या आहेत. बिलच भेटत नसल्याने आम्हाला किती मालमत्ता कर भरायचा याची माहिती होत नसल्याचे रहीवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर महापालिका प्रशासन मालमत्ता कराचे बिल पाठवत नाही तसेच विलंब झाल्यास दंडही आकारणार, हे चुकीचे आहे. समस्येचे गांभीर्य पाहता येथील रहीवाशांना मालमत्ता कराचे बिल (पावती) देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.