वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य श्री राम मंदिरात श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्यातर्फे नवी मुंबई, ठाणे आणि मीरा- भाईंदरमधील सर्व मंदिरांमध्ये महाप्रसाद म्हणून २५००० किलोचे लाडू वाटप करण्यात येणार आहेत. हे प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तक नगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत. प्रसादाचे लाडू बनवण्याच्या शुभारंभ प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंग, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, साईनाथ सेवा समितीचे संस्थापक- अध्यक्ष बळीराम नईबागकर , कार्यकारी-अध्यक्ष मंगेश नईबागकर, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ उपक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मंगेश नईबागकर, सचिव सुरेश महाडिक, विश्वस्त प्रवीण रोठे आदी उपस्थित होते. हा रामप्रसाद तयार करण्यामध्ये संजीव नाईक मित्र मंडळ, रुद्र प्रतिष्ठान अन्य संस्था सहभागी झाल्या आहेत.