वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नवी मुंबई भाजपा संघटनात्मक पातळीवर बळकट करताना मुख्य कार्यकारिणीसोबत विविध सेलदेखील भक्कम करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने विविध सेलवर सक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यही आहेत.
सुहासिनी नायडू या गेल्या अनेक वर्षापासून नेरूळ नोडमधील राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदही त्यांनी काही वर्षे सांभाळले आहे. नागरी समस्या सोडविणे, नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग ही नेरूळ नोडमध्ये सुहासिनी नायडू यांची ओळख आहे. कोरोना काळात त्यांनी रस्त्यावर उतरून अन्नवाटपापासून रुग्णालयीन मदत आदी कामात हिरीरीने योगदान दिलेले आहे. नवी मुंबई भाजपामध्ये संघटनात्मक पातळीवर काम करणारा चेहरा अशी सुहासिनी नायडू यांची प्रतिमा आहे. आपल्या निवडीबाबत त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आभार मानताना नवी मुंबईतील कामगारांच्या समस्या सोडविताना श्रमिक वर्ग अधिकाधिक प्रमाणावर भाजपामध्ये आणण्याला प्राधान्य दिले जाईल व केंद्र सरकाराच्या कामगार हितैषी योजना व धोरणांविषयी कामगारांमध्ये संदीप नाईकांच्या माध्यमातून जनाजागृती करण्याला प्राधान्य दिले जाईल असे सुहासिनी नायडू यांनी यावेळी सांगितले.