स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अयोध्या नगरीत सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा तसेच राम मंदिराचे लोर्कापण यानिमित्ताने नवी मुंबई भाजपाच्या वतीने नेरूळमध्ये सांयकाळी आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर १२ मधील तेरणा विद्यालयाच्या क्रिडांगणावर सुस्वर श्री राम गीतांची संगीतमय संध्या या कार्यक्रमाचे भाजपाकडून आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सत्कार सोहळा, महाआरती आणि आतषबाजी याचाही यामध्ये समावेश आहे. सांप्रदायिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणारी देवस्थाने, संस्था याचा समावेश आहे. महाआरतीमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी सोबत आरतीचे ताट आणावे, अशा सूचना नवी मुंबई भाजपाकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नेरूळ नोडमधील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई भाजपाचे जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.