वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशातील नागरिक सुरक्षित आहेत कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा आहे, या भावनांमधून नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सैनिकांप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या आहेत.
थलसेना दिनानिमित्त सीबीडी येथील कोकण भवन कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शासकीय-निमशासकीय सेवेतील निवृत्त सैनिकांच्या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच शास्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाला लोकनेते आमदार गणेश नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भेट देऊन सैनिकांचे देशाप्रती असलेले समर्पण, त्याग आणि देश प्रेमाला मानवंदना दिली. निवृत्तीनंतरही माजी सैनिकांमध्ये देशसेवेची भावना तेवढीच प्रखर आहे. आपल्या सैनिकांकडून कर्तव्य भावनेची प्रेरणा नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले तर लोकनेते गणेश नाईक यांनी सैनिकांमध्ये देशसेवेची भावना चिरकाल असल्याचे सांगितले.