वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात आरोग्य उपायुक्त डॉ. राहूल गेठेप्रकरणी निर्माण झालेले कामगार वर्तुळात निर्माण झालेले वादळ अद्यापि शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. डॉ. राहुल बी. गेठे[ वैद्यकीय अधिकारी यांची प्रतिनियुक्तीच्या कोट्या मधूनउप आयुक्त या पदावर कायमस्वरूपी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियन उच्च न्यायालयात गेली असता, नगरविकास सचिवाकडे जाण्याचा सल्ला देताना न्यायालयाने नगर विकास विभागाने कार्यवाही न केल्यास पुन्हा न्यायालयात येण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी न्यायालयीन निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास विभागाचे सचिवांना निवेदन सादर केले आहे. येत्या १०-१२ दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने व नगर विकास सचिवांनी कार्यवाही न केल्यास पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने डॉ. राहूल गेठे यांची नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीच्या कोट्यातून उपआयुक्त पदावर नियुक्ती केली होती. महापालिकेत सक्षम अधिकारी असताना महापालिकेतीलच अधिकाऱ्यांना प्रमोशन देणे आवश्यक असताना डॉ. गेठे यांची नियुक्ती केली. यालाच महाराष्ट्र कर्मचारी युनियननने आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेता – महाराष्ट्र , मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मुख्य न्यायाधीश , उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे निवेदनही सादर केले होते.
आक्षेप घेताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी या विषयाबाबत संदर्भीय शासन निर्णय ची छायांकित प्रत सुलभ संदर्भासाठी, या निवेदनासोबत जोडून सादर केली होती. प्रस्तुत शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी या पदावर सेवेत असलेले डॉक्टर राहुल बी. गेठे यांची नियुक्ती उप आयुक्त या पदावर, प्रतिनियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या ५०% उप आयुक्त पदामधून नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेवर कायमस्वरूपी केलेली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका [सुधारित] अधिनियम १९४९ मधील कलम ४५ B मधील तरतुदीचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास, असे प्रकर्षाने दिसून येते की, महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर केलेल्या संविधानिक पदाच्या ५०% पदावर राज्य शासनाच्या सेवेतील योग्य अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी सर्वप्रथम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करावी लागते. अशाप्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेलीअधिसूचना अन्वये Feeder Cadre करिता निश्चित करण्यात आलेल्या एकूण पदाच्या पन्नास टक्के इतक्या पदावर, राज्य शासनाच्या सेवेतील ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रतिनियुक्तीवर राज्य शासनाने केलेली आहे त्या अधिसूचनेस विधानसभा व विधानपरिषदेची कार्यमान्यता घ्यावी लागते. महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेच्या स्थापनेवरील ज्यामंजूर पदावर राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केल्यामुळे,महानगरपालिकेच्या सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होणेकरिता जितक्या पदावर राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी प्रतिनियुक्तीने, नियुक्ती केलेली आहे. तितकेच पदे महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर करणे कायद्याने बंधनकारक केलेले असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनातून संबंधितांच्या निदर्शनास आणून देताना मंत्रालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावाही केला होता.
महाराष्ट्र महानगरपालिका [सुधारित] अधिनियम १९४९ मधील कलम ४५ B मध्ये राज्य शासनाला त्यांच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्याची महानगरपालिकेच्या स्थापनेवरील राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीच्या कोट्या करिता उपलब्ध असलेल्या ५०% पदामधून कायमस्वरूपी महापालिकेच्या स्थापनेवर नियुक्ती करण्याचा अधिकार नाही. उपरोक्त कायदेशीर तरतुदीचा अभ्यास केल्यास असे सह प्रमाण दिसून येते की, राज्य शासनाने संदर्भीय शासन निर्णय दिनांक: २०/०८/२०२३3 अन्वये डॉ. राहुल बी.गेठे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापने उप आयुक्त या पदावर करण्यात आलेली नियुक्ती हे राज्य शासनाची अधिकार बाह्यकृती असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले होते.
डॉक्टर राहुल बी. गेठे, वैद्यकीय अधिकारी यांना प्रशासनातला कोणता अनुभव नसल्यामुळे तसेच महानगरपालिकेच्या स्थापनेवर राज्य शासनाच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्याची कायमस्वरूपी उप आयुक्त या पदावर ची करण्यात आलेली,नियुक्ती ही अधिकार बाह्य आहे. म्हणून सदरची नियुक्ती आदेश व शासन निर्णय त्वरित रद्द करण्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले होते.
न्यायालयीन निर्देशाप्रमाणे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी पुन्हा नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास सचिवांना निवेदन सादर केले असून याप्रकरणी लवकर निर्णय न झाल्यास पुन्हा एकवार आपण उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती रविंद्र सावंत यांनी दिली आहे.