वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारत देशाचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संपूर्ण देशभरात “नमो चषक-२०१४ ची सुरुवात झाली होती. याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघ आयोजित आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून नमो चषक २०२४ व भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातील क्रिकेटचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात करावे येथील कै. गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये पार पडला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामधील संपूर्ण विभागामध्ये नमो चषक स्पर्धा पार पडल्या. त्याच प्रमाणे गेल्या महिनाभर ज्येष्ठांकरिता, महिला व तरुण-तरुणींसाठी फुटबॉल, कॅरम/बुद्धिबळ, कबड्डी व १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, नृत्य, गायन, वेशभूषा, चित्रकला अशा विविध स्पर्धा बेलापूर विधानसभामध्ये पार पडल्या आहेत या सर्व स्पर्धेला लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत उत्तम उत्स्पुर्द असा प्रतिसाद मिळाला असून हजारो स्पर्धकांनी नमो अॅप्सवर आपली नाव नोंदणी करून सहभाग नोंदविला.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, देशाचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संपूर्ण देशभरात “नमो चषक-२०२४ सुरु असून काल बेलापूर विधानसभामध्ये नमो चषक २०२४ च्या क्रिकेट स्पर्धेचा सांगता समारंभ हा करावे येथील कै. गणपतशेठ तांडेल मैदान येथे उत्साहात पार पडला. या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रातील एकूण २८ संघ तसेच ४०+ संघाचे ८ संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. या नवी मुंबईतील तरुणांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे व नवी मुंबईतील खेळाडू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप निर्माण करतील हा उद्दिष्ट लक्षात घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक जय गजानन तुर्भे, १,५०,०००/- व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक आराध्या ११ शहाबाज १,००,०००/- व आकर्षक चषक देऊन या संघाला गौरविण्यात आले उत्कृष्ट फलंदाज अक्षय कोळी, उत्कृष्ट गोलंदाज अजित चव्हाण, उत्कृष्ट क्षेत्रक्षक राकेश यांना प्रत्येकी आकर्षक चषक व LED TV देऊन गौरविण्यात आले. तसेच संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट मालिकावीर म्हणून रवी म्हात्रे यांना मोटर साईकल व आकर्षक चषक देण्यात आले. तसेच प्रेक्षणीय सामने म्हणून ४०+ संघ हि खेळविण्यात आले होते. या ४०+ क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सारसोळे ४०+ तर द्वितीय पारितोषिक दारावे ४०+ या संघांनी बाजी मारली. तसेच उत्कृष्ट फलंदाज जयेश मेहेर, उत्कृष्ट गोलंदाज रवी तांडेल यांना प्रत्येकी आकर्षक चषक व LED TV देण्यात आली. तसेच संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट मालिकावीर म्हणून राजेश भोईर यांना आकर्षक चषक व LED TV देवून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या संघातील प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व या स्पर्धेमध्ये बक्षिसांची लयलूट देखील पहावयास मिळाली.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक तथा परिवहन समिती सदस्य काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, समाजसेवक दिलीप पाटील, समाजसेवक कुंदन म्हात्रे, समाजसेवक विकास सोरटे, पुण्यनाथ तांडेल, जयवंत तांडेल, गुरुनाथ तांडेल, संजय ओबेरॉय, विकास सोरटे, प्रताप भोसकर, सचिन नाईक, तसेच असंख्य खेळाडू व नागरिक उपस्थित होते.